NeelimaChaudharyChunkhare
3,588 views
19 slides
Aug 04, 2015
Slide 1 of 19
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
About This Presentation
Its about breast feeding in local language -Marathi
Size: 2.2 MB
Language: none
Added: Aug 04, 2015
Slides: 19 pages
Slide Content
स्तनपान
स्तनपान देणाºया मातेचा आहार : मातेने सकस , ताजा , सर्व अन्नघटकांचे योग्य प्रमाण असलेला आहार घेणे चांगले . आईने स्वत : दररोज अर्धा ते पाऊण लिटर दूध सेवन करावे . द्रव पदार्थ भरपूर घ्यावेत .
काही जणांची अशी समजूत असते की खूप जास्त मेद असलेला आहार चांगला . ( हाय अमाउंट आॅफ फॅट्स ) परंतु जर हे प्रमाण अति असेल तर आईचे वजन प्रमाणाबाहेर वाढू शकते . सर्व जीवनसत्त्वे , खनिजे व लोहयुक्त आहार घ्यावा . अळीव , डिंक , खसखस इ. अन्नघटकांमुळे दूध जास्त प्रमाणात येण्यास मदत होते .
प्रसूतीनंतर आईचा रोजचा आहार सुधारण्याची गरज आहे . आईला दूध येत असेल आणि बाळाचे पोट भरत नसेल तर शतावरीसारखी आयुर्वेदिक औषधे तसेच काही अॅलोपॅथिक औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेता येतील . मात्र , तरीही आईने ठरावीक अंतराने पौष्टिक आहार घेणे हाच सर्वोत्तम उपाय आहे .
बाळाला स्तनपान पुरेसे आहे का ? दोन स्तनपानांच्या मधल्या काळात बाळ शांत झोपत असेल , सारखे रडत नसेल , दिवसातून 10-12 वेळा शू करत असेल , तर सर्वसाधारणपणे असे म्हणता येईल की बाळाला स्तनपान पुरेसे मिळत आहे . जन्मानंतर 15 दिवसांनी बाळाचे वजन केल्यावर ते वजन जन्मत : असलेल्या वजनाएवढे किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर आईचे दूध बाळाला पुरेसे आहे . तीन महिन्यांपर्यंत दररोज बाळाचे वजन 25-30 ग्रॅम वाढत असल्यास स्तनपान पुरेसे आहे . काही वेळा बाळाला आईचे दूध देता येत नाही .
स्तनांमध्ये ताठरपणा व वेदना असल्यास , स्तनांमध्ये दूध जास्त साठून राहिल्यास स्तन घट्ट , ताठर होतात . आईला खूप दुखते व थोडा तापही येतो . हलक्या हाताने मसाज करून व गरम पाण्याने शेकून दूध काढून टाकावे लागते . दूध साठून राहिल्यास व त्यात जंतुसंसर्ग झाल्यास गळू होऊ शकते .
शस्त्रक्रिया करून हे गळू काढून टाकावे लागते . यामध्ये वेदनाही खूपच जास्त होतात . तसेच गळू पूर्ण भरून येईपर्यंत त्या बाजूने दूधही देता येत नाही . गळू न होण्यासाठी दर थोड्या वेळाने स्तन रिकामे होणे व जास्त प्रमाणात दूध साठू न देणे हे खबरदारीचे उपायच महत्त्वाचे ठरतात .
योग्य पद्धतीने स्तनाग्रे बाळाच्या तोंडात न दिल्यास स्तनाग्रांना भेगा पडू शकतात . यामध्ये खूपच वेदना होतात . योग्य पद्धत अनुभवी व जाणकार व्यक्तीकडून पहिल्या वेळीच शिकून घेणे चांगले . कधी-कधी बाळाला आईचे स्तनपान करता येत नाही आणि कृत्रिम स्तनाग्राने स्तनपान द्यावे लागते . हे रबराचे / प्लास्टिकचे निप्पल खूप मऊ असते . एकदा त्याची सवय झाली की बाळ नैसर्गिक स्तनपान करताना रडते .
स्तनाग्रे आत वळलेली असल्यास , थोड्या प्रमाणात असल्यास उपाय करता येतात , पण स्तनाग्रे पूर्णपणे आत असतील तर ब्रेस्ट पंपाचा वापर करावा लागतो . प्रसूतिपूर्व तपासणीतच याचे निदान होणे आवश्यक असते .