संशोधांनाचे प्रकार Prof. Dr. Makarand Joshi MSM’s COPE Aurangabad 3/16/2021 Prof.Dr. Makarand Joshi
ज्ञानाच्या क्षेत्रातील शास्त्रीय व वैज्ञानिक चौकशीचे किंवा तपासाचे मूलभूत साधन म्हणजे संशोधन. संशोधन हे तीन मुख्य संदर्भात चर्चिले जाते. त्याचे तीन प्रमुख प्रकार मानले जातात. 1) मूलभूत वा पायाभूत संशोधन ( Basic / Fundamental Research) 2) उपयोजित संशोधन ( Applied Research) 3) कृतीसंशोधन ( Action Research). संशोधनाचे प्रकार 3/16/2021 Prof.Dr. Makarand Joshi
मूलभूत संशोधनात संबंधित विषय विभागात अत्यंत मूलगामी , सखोल , सर्वसमावेशक , सर्वव्यापी विचार केला जातो. तात्विक चर्चेचा भाग अशा प्रकारच्या संशोधनात जास्त असतो . हे संशोधन करताना जो नमुना किंवा न्यादर्श घ्यायचा , त्याची निवड अत्यंत काळजीपूर्वक केलेली असते. तरच संशोधनाचे निष्कर्ष सर्वव्यापी होऊ शकतील. माहितीचे संकलन , पृथक्करण अत्यंत काळजीपूर्वक केले जाते. या प्रकारच्या संशोधनात ज्ञानासाठी ज्ञान हीच भूमिका असते. ज्ञान हे या संशोधनाचे प्राथमिक उद्दिष्ट असते व उपयोजन हे दुय्यम उद्दिष्ट असते . संबंधित विषयाची सखोलता , समृद्धी वाढावी हीच संशोधनाच्या मागे असणारी प्रारंभिक प्रेरणा असते. १) मूलभूत व पायाभूत संशोधन. 3/16/2021 Prof.Dr. Makarand Joshi
मुलभूत संशोधन हे सिद्धांताभिमुख असते. कॅलींगर ( 1979 ) यांनी म्हटल्याप्रमाणे , मूलभूत संशोधन हे सिद्धांत परीक्षणासाठी केले जाते. संशोधनाच्या निष्कर्षांचा व्यावहारिक समस्या सोडविण्यासाठी उपयोग होईल किंवा नाही याचा त्यात मुळीच विचार नसतो. मानवी आणि सामाजिक समस्या सोडविण्याच्या हेतूने मुलभूत संशोधन हे कधीच हाती घेतले जात नाही. नैसर्गिक व सामाजिक घटनांसंबंधीचे ज्ञान मिळविणे , त्यांचे स्पष्टीकरण करणे व त्याबाबत भविष्यकथन करणे , एवढाच एकांतिक उद्देश मूलभूत संशोधनाचा असतो. याची सुरुवात एखाद्या मूलभूत उपपत्तीने किंवा सिद्धांताने केली जाते मूलभूत व पायाभूत संशोधन 3/16/2021 Prof.Dr. Makarand Joshi
मूलभूत संशोधनाने त्या त्या क्षेत्रात मूलभूत तत्वे व नियम यांच्या निर्मितीद्वारे प्रस्थापित झालेल्या सिद्धांतात , ज्ञानात मोलाची भर पडत असते. सिद्धांतनिर्मिती बरोबर प्रस्थापित सिद्धांताचे परीक्षण करून बदललेल्या परिस्थितीत त्यांचे सत्यापन करणे हे देखील मूलभूत संशोधनाचे कार्य असते. मूलभूत संशोधनाच्या निष्कर्षांच्या आधारे मांडलेले सामान्य नियम व संबंधदर्शक सामान्य विधाने , सामान्यकृत असल्याने ती प्रामुख्याने अमूर्त स्वरूपाची असतात. मूलभूत व पायाभूत संशोधन 3/16/2021 Prof.Dr. Makarand Joshi
उपयोजित संशोधन हे व्यवहाराभिमुख असते. उपयोजित संशोधन हे व्यावहारिक उपयोगासाठी ज्ञान , या हेतूने प्रेरित झालेले असते. मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रातील समस्यांच्या निराकरणासाठी संशोधन निर्मिती , ज्ञानाची वा सिद्धांताची उपयुक्तता आजमावून पाहणे व विशिष्ट समस्यांच्या निराकरणासाठी नवीन ज्ञान निर्माण करणे हे उपयोजित संशोधनाचे प्रमुख हेतू असतात. २) उपयोजित संशोधन 3/16/2021 Prof.Dr. Makarand Joshi
उपयोजित संशोधनातही ही नवीन ज्ञानाची निर्मिती होते , परंतु ते ज्ञान विशुद्ध स्वरूपाचे नसून समस्या सापेक्ष असते. उपयोजित संशोधनात प्रदत्त कार्यक्षेत्रातील सामान्य समस्यांवरच लक्ष केंद्रित केले जाते . त्यात शास्त्रीय सिद्धांताची व्यावहारिक उपयुक्तता तपासून पाहिली जाते , या संशोधनातील निष्कर्षांचे सामान्यीकरण मर्यादित स्वरूपाचे असते. त्याचे निष्कर्ष प्रदत्त कार्यक्षेत्र पुरतेच मर्यादित असतात. उपयोजित संशोधन 3/16/2021 Prof.Dr. Makarand Joshi
संशोधक व संशोधन निष्कर्ष याचा उपभोक्ता यामधील दुरावा व द्वैत नाहीसे करून संशोधनात सुसंगतता आणावी यासाठी कृती संशोधन ही संकल्पना पुढे आली. कृती संशोधनात संशोधन करणे व संशोधनाच्या निष्कर्षाची अंमलबजावणी करणे या दोन्ही भूमिका एका व्यक्तीसच करावयाच्या असतात. ३) कृतीसंशोधन. 3/16/2021 Prof.Dr. Makarand Joshi
हॅल्से ( 1972) " वास्तविक जगात घडत असलेल्या घटनाक्रमात अल्पसा हस्तक्षेप करून त्याच्या परिणामाचे सूक्ष्म परीक्षण करणे म्हणजे कृतीसंशोधन होय". कोरे ( 1953) " आपले निर्णय व उपक्रम यांच्या बाबतीत मार्गदर्शन मिळावे , त्यात सुधारणा व्हाव्यात व त्यांचे योग्य तऱ्हेने मूल्यमापन व्हावे , म्हणून व्यावसायिकांनी आपल्या समस्यांचा वैज्ञानिक पद्धतीने स्वतःच अभ्यास करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे कृती संशोधन होय." कृतीसंशोधन 3/16/2021 Prof.Dr. Makarand Joshi