1) क्षिप्र मर्म – स्थान – पायाचा अंगठा व त्याच्या नजीकची अंगुली यांच्या मध्ये संख्या – 2 प्रकार – रचनेनुसार – स्नायु मर्म परिणामानुसार – कालान्तर प्राणहर मर्म परिमाण – अर्धांगुली विध्द लक्षणे – अतिशय रक्तस्त्राव होतो व आक्षेप नावाच्या रोगाने मनुष्याचा मृत्यू होतो . रचना – First Dorsal Metatarsal artery, Deep Peroneal Nerve
2) तलहृदय मर्म – स्थान – पादतलाच्या मध्यावर मध्यमा अंगुलीच्या रेषेत संख्या – 2 परिमाण – अर्धांगुली प्रकार – रचनेनुसार – मांसमर्म परिणामानुसार – कालान्तर प्राणहर मर्म विध्द लक्षणे – रक्तस्त्राव अधिक होतो , तीव्र वेदना होतात रचना – Plantar Arch, Medial and Lateral Plantar Nerve, Long Plantar Lig .
3) कूर्च मर्म – स्थान – क्षिप्र मर्माच्या वर दोन अंगुले , उर्ध्व व अधो दोन्ही बाजूस संख्या – 2 प्रकार – रचनेनुसार – स्नायुमर्म परिणामानुसार वैकल्यकर मर्म परिमाण – चार अंगुली विध्द लक्षणे – पाय वाकडा होतो , थरथर कापतो . रचना – Tarso Metatarsal and Intertasal Ligaments
4) कुर्चशिर मर्म - - स्थान – गुल्फ संधिच्या खाली अभिमध्य आणि पार्श्व दोन्ही बाजूस संख्या – 2 प्रकार – रचनेनुसार – स्नायुमर्म परिणामानुसार – रुजाकर मर्म परिमाण – २ अंगुली विध्द लक्षणे – तीव्र वेदना होतात व सूज येते . रचना – Deltoid Lig . Tarsocalcaneal Lig .
5) गुल्फ मर्म – स्थान - पाद आणि जंघा यांच्या संयोगस्थानी म्हणजे गुल्फ संधि होय . संख्या – 2 प्रकार – रचनेनुसार – स्नायुमर्म परिणामानुसार – वैकल्यकर मर्म परिमाण – दोन अंगुली विध्द लक्षणे – तीव्र वेदना होतात , स्तब्धपादता किंवा लंगडेपणा निर्माण होते रचना – Ankle Joints, Inferior Tibio Fibular Joints, Talocalcanean Articulation
6) इंद्रबस्ति मर्म – स्थान – जंघा प्रान्तामध्ये पार्ष्णाच्या बाजूस टाचेपासुन वरील बाजूस १३ अंगुले संख्या – 2 प्रकार – रचनेनुसार – मांसमर्म परिणामानुसार – कालान्तर प्राणहर मर्म परिमाण – १/२ अंगुली विध्द लक्षणे – रक्त स्त्राव जन्य क्षयाने मृत्यु रचना – Peroneal and Post Tibial Artieries , Tibial Nerve
7) जानु मर्म – स्थान – जंघा व उरु यांच्या मिलनस्थानी संख्या – 2 प्रकार – रचनेनुसार – संधि मर्म परिणामानुसार – वैकल्यकर मर्म परिमाण – ३ अंगुली विध्द लक्षणे - लंगडेपणा येते , विकलांगता निर्माण होते . रचना – Capsular ligament, Ligamentum Patellae, Transverse Ligaments
8) आणी मर्म - स्थान – जानुसंधिपासून ३ अंगुली वर , दोनी बाजूस संख्या – 2 प्रकार – रचनेनुसार – स्नायुमर्म परिणामानुसार – वैकल्यकर मर्म परिमाण – १/२ अंगुली विध्द लक्षणे – या मर्माचा वेध झाला असता सूज येते , सक्थि स्तब्धता निर्माण होते रचना -Patella, Tendon of quadriceps Femoris
9) उर्वी मर्म – स्थान – उरुच्या मध्यभागी संख्या – 2 प्रकार – रचनेनुसार – सिरामर्म परिणामानुसार – वैकल्यकर मर्म परिमाण – १ अंगुली विध्द लक्षणे - रक्तक्षय होऊन सक्थि सुकते व विकलता प्राप्त होते रचना – Aductor Canal, Femoral artery Femoral Vein, Saphenous Nerve
10) लोहिताक्ष मर्म – स्थान – उर्वी मर्माच्या वर वंक्षण संधिच्या खाली उरुमूलामध्ये संख्या – 2 प्रकार – रचनेनुसार – सिरामर्म परिणामानुसार – वैकल्यकर मर्म परिमाण – १/२ अंगुली विध्द लक्षणे – रक्तक्षयाने पक्षाघात , सक्थीषोष निर्माण होते . रचना – Femoral Traingle , Femoral artery
11) विटप मर्म – स्थान – वक्षण आणि वृषण यांच्यामध्ये संख्या – 2 प्रकार – रचनेनुसार – स्नायुमर्म परिणामानुसार – वैंकेल्यकर मर्म परिमाण – १/२ अंगुली विध्द लक्षणे – आघाताने नपुंसकता निर्माण होते , अल्पशुक्रता निर्माण होते रचना – Inguinal CanaL , Spermatic Cord, Ductus Deferens