Chakramard = Cassia tora

479 views 11 slides May 31, 2021
Slide 1
Slide 1 of 11
Slide 1
1
Slide 2
2
Slide 3
3
Slide 4
4
Slide 5
5
Slide 6
6
Slide 7
7
Slide 8
8
Slide 9
9
Slide 10
10
Slide 11
11

About This Presentation

dravyaguna lecture slide of Chakramard = Cassia tora


Slide Content

चक्रमर्द Vd . Prajkta Abnave PG scholar Dravyaguna vigyan

Family = Leguminoseae Botanical name = Cassia tora English = Ringworm Plant म. = टाकळा . सं . = चक्रमर्दः दद्रुघ्नः एडगज खर्जुघ्न चक्रगज चक्रमर्दः - चक्रं दद्रुरोगं मृद्नाति इति । दद्रु मर्दन करता है । दद्रुघ्नः = दद्रु नष्ट

चक्रमर्दः शिबिफल : पीतपुष्पोऽगुल्मकः । वर्षाभवः पंक्तिपत्रो द्रुध्नेति प्रकीत्तितः ॥ शिवदत्त . वर्णन = ३३ ते २ मीटर उंचीचे वर्षायू व दुर्गंधीयुक्त क्षुप . पर्ण - संयुक्त , पत्रकांच्या तीन जोड्या , मेथीच्या पानासारखे दिसणारे पत्रक . खालच्या पत्रकांच्यामध्ये एक रेखाकार गाठ . पुष्प - पिवळे , एकाकी किंवा जोडीत उगवणारे , १ सेंमी . व्यासाचे . १५ ते ३० सेंमी . लांबीची , चतुष्कोणी व किंचित वळलेली शेंग . बीज आयताकार व तांबूस काळपट . पावसाळ्यात फुले व हिवाळ्यात फळे येतात .

मु . गुण - लघु , रूक्ष . रस - कटु , मधुर विपाक - कटु . वीर्य - उष्ण . दोषघ्नता - कफवातशामक . बीज - लघु , रुक्ष , कटु , उष्ण गुणाचे असते , पाने गोड व शीतवीर्य असतात .

चक्रमर्दो लघुः स्वादू रूक्षः पित्तानिलापहः । हृद्यो हिमः कफश्वासकुष्ठदद्रुकृमीन हरेत् ।। हन्त्युष्णं तत्फलं कुष्ठकण्डूदद्रुविषानिलान् । गुल्मकासकृमिश्वासनाशनं कटुकं स्मृतम् ॥ भा . प्र . स्रोतोगामित्व - दोष - वातकफघ्न , धातु - मेद ( कमी करणारा ), रक्त ( दद्रुहर कान्तिद – यकृत उत्तेजक , शोधक ) मल - पुरीष ( कृमी ) अवयव - प्राणवहस्रोतस , अन्नवह , रक्तवहस्रोतस .

स्थानिन - लेखन , कुष्ठघ्न आणि विषघ्न असल्याने कुष्ठ , अर्श आणि विषविकारात लेप करावा . दही किंवा कांजीत बिया भिजवून व लिंबाच्या रसात घोटून कुष्ठात लेप करावा . विशेषतः दद्रूमध्ये ( गजकर्ण ) उपयुक्त . चरकः - १. सिध्मकुष्ठे-एडगजः सर्जरसोसिध्मकुष्ठानाम् । कांजिकयुक्तं तु पृथङ्मतमिदमुद्वर्त्तनं क्रमशो लेपाः ॥ सिध्म कुष्ठ - चक्रमर्द मूल + कांजी घोटून लेप ( चि . ७ - १२४. ) दद्रो - चक्रमर्दकबीजञ्च , मूलकाम्बुप्रपेषितम् । दद्रुघ्नं लेपनं कुर्यात् ’ ( बंगसेनः )

चक्रमर्द बीज + मूलक के पत्रस्वरस घोटून दद्रु लेप करंज तेल + चक्रमर्द बीजों पीस = लेप किलॉईड नावाच्या त्वग्रोगावर याचे बी त्रिधारी निवडुंगाच्या रसात वाटून गोमूत्रात खलून लावतात . वाग्भट :- २. शिरोरोगे -" लेपे तु प्रपुन्नाटोऽम्लकल्कितः ।। उ. २४-१०. शिरोरोग - चक्रमर्द बीज खटाई वाटून लेप

शोढलः - ३. सूर्यावर्धावभेदयोः नस्य-योग :- चक्रमर्दकबीज लेपः काजिकपेषितैः ॥ शिरोरोगाधिकारे आधाशीशी - चक्रमर्द बीज + कांजी - वाटून लेप शोढलः - गण्डमाला में-चक्रमर्द मूल कल्क + भृङ्गराजस्वरस तैल + मृदु अग्नि = सिद्ध तेल + सिन्दूर = उपयोग दारुण गण्डमाला नष्ट

सुश्रुत चक्रमर्द शाक = पत्रशाक विरेचक गुण , रक्तदोष - हितकारी कोवळ्या पानांची भाजी करतात . पाने सोनामुखीप्रमाणे विरेचन , हृद्य आणि रक्तप्रसादन असल्याने हृद्रोग आणि रक्तविकारात , कफनि:सारक असल्याने कासश्वासात , कुष्ठघ्न असल्याने कुष्ठात पानांचा रस किंवा भाजी व बीजचूर्ण ; तसेच विषरोगात लेखन म्हणून , मेदोरोगात आणि औपसर्गिक रोगप्रतिबंधक म्हणून वापर करावा .

उत्पत्तिस्थान - भारतात सर्वत्र , विशेषत : उष्ण प्रदेशात . उपयुक्तांग - बीज , पत्र . मात्रा - बिया - १ ते ३ ग्रॅम , पानांचा रस ३ ते ६ मि.लि . कल्प - दद्रुघ्नीवटी . बिया भाजून दळून त्यांची कॉफी करतात . ( ती उग्र लागते .)