Democracy

GAJANANBORKAR5 1,084 views 11 slides Aug 13, 2021
Slide 1
Slide 1 of 11
Slide 1
1
Slide 2
2
Slide 3
3
Slide 4
4
Slide 5
5
Slide 6
6
Slide 7
7
Slide 8
8
Slide 9
9
Slide 10
10
Slide 11
11

About This Presentation

Democracy


Slide Content

लोकशाही ( Democracy ) प्रा. गजानन बोरकर महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. प. वाणिज्य महाविद्यालय आरमोरी

लोकशाही ( Democracy )

प्रस्तावना :- लोकशाही ही एक जीवन पद्धती आहे. तो एक राज्यघटनेचा व राज्यव्यवस्थेचा प्रकार आहे. सामाजिक जीवनाच्या आवश्यकतेतून − अपरिहार्यतेतून जीवन व्यतीत करण्याच्या ज्या काही विचारप्रणाल्या आणि आचारधर्म प्रसृत झाले, त्यांपैकी लोकशाही ही एक आहे म्हणून समाज आणि संस्कृती यांना उद्देशून लोकशाही या शब्दाचा वापर करणे अर्थपूर्ण ठरते. समाज व संस्कृती यांचे वळण जर लोकशाही पर नसेल, तर लोकशाही पद्धतीचे संविधान स्वीकारूनही त्या देशात लोकशाही रूजणे व टिकणे अवघड जाते. याउलट, एखाद्या देशात लोकशाही पद्धतीने दीर्घकाळ राज्यकारभार चालू असता, त्या देशातील समाजाला व संस्कृतीला लोकशाही वळण प्राप्त होते. अशा प्रकारे या दोन्हींमधील परस्परसंबंध स्पष्ट करता येतो.

लोकशाहीचा अर्थ लोकशाही हा डेमॉक्रसी या इंग्रजी संज्ञेचा मराठी प्रतिशब्द. त्याची इंग्रजी व्युत्पत्तिकोशात डिमॉस ( Demos) + क्रसी ( Cracy ) अशी फोड केली असून त्यांचा अनुक्रमे ‘सामान्य लोक’ व ‘सत्ता’ असा अर्थ दिला आहे.हा शब्द डिमॉस + क्रॅटोस ( Demos + Kratos ) या ग्रीक शब्दापासून झालेला असून त्याचे लॅटिन रूप डिमॉक्रॅशिया असे आढळते. म्हणून लोकशाही म्हणजे लोकांची सत्ता होय .

लोकशाहीची व्याख्या १ अब्राहीम लिंकन च्या मते , " लोकांनी लोकांकरिता ,लोकांच्या कल्याणासाठी चालवण्यात आलेले शासन म्हणजे लोकशाही होय . “ २ लॉर्ड ब्राईस च्या मते , "लोकशाही म्हणजे असा शासन प्रकार कि,ज्यामध्ये सत्ता एका विशिष्ट लोकांच्या नसते तर संपूर्ण जनतेच्या हाती असते . “ ३ प्रा. डायसी च्या मते , " लोकशाही शासनाचा असे रूप आहे कि , ज्यामध्ये जनतेचा फार मोठा भाग शासन करतो . "

लोकशाहीचा उगम व विकास लोकशाहीस काही अंशी पूरक असे प्रयोग प्राचीन ग्रीसमधील नगरराज्यांत, विशेषतः अथेन्समध्ये, इ.स.पू. पाचव्या शतकात झाले . १ प्राचीन ग्रीक नागरराज्य २ १२१५ चा मॅग्नाकार्टा कायदा ३ रक्तहीन क्रांती ४ लोकशाहीचे तत्वज्ञान ५ अमेरिकन राज्यक्रांती ६ फ्रेंच राज्यक्रांती 6 लोकशाही विकासाच्या वाटचाली ८ भारतीय संविधान

लोकशाहीचे स्वरूप (Nature) १ लोकशाही हा शासनाचा एक प्रकार आहे २ लोकशाही हि एक समाजव्यवस्था आहे ३ लोकशाही हि एक जीवनपद्धती आहे ४ लोकशाही एक नैतिक संकल्पना आहे

लोकशाहीचे घटक १ जनतेचे सार्वभौमत्व २ बहुमताचे शासन ३ व्यक्तिस्वातंत्राला महत्व ४ राजकीय समता ५ लोकमतानुसार शासन ६ जबाबदारी आणि व्यक्तिमत्वाचा आदर ७ स्वातंत्र ,समता आणि बंधुभाव

लोकशाहीची वैशिष्ट्ये : १ लोकांचा सहभाग २ स्वातंत्र आणि समता यांचे संमिश्रण ३ कायद्याचे शासन ४ अधिकाराची व्यवस्था ५ अल्पसंख्यकांचे संरक्षण ६ निवडणुका ७ लोककल्याणकारी शासन ८ राज्य हे व्यक्तिहिताचे साधन

लोकशाहीचे गूण १ श्रेष्ठ जीवनमूल्यावर आधारित २ व्यक्तिस्वातंत्र आणि व्यक्तिविकास ३ जनहितासाठी सत्तेचा वापर ४ जबाबदारीचे तत्व ५ कार्यक्षमता ६ सार्वजनिक शिक्षण ७ नैतिक गुणांचा विकास ८ नेतृत्वाचा विकास ९ क्रांतीची शक्यता नसते १० शासनाच स्थैर्य

लोकशाहीचे दोष १ संख्येला महत्व २ अयोग्य व्यक्तीचे शासन ३ नैतिक विकासासाठी घातक ४ वेळेचा आणि पैशाचा अपव्यय ५ श्रीमंतांचे शासन ६ राजकीय पक्षाचा हितकारी प्रभाव ७ नोकरशाहीची सत्ता