This IPR slides are uploaded for students in MARATHI language.
Size: 267.58 KB
Language: none
Added: Dec 05, 2021
Slides: 26 pages
Slide Content
Intellectual Property Rights बौद्धिक संपदा अधिकार केळकर वंदना गोविंद ग्रंथपाल यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, हलकर्णी दि. ०६/०३/२०२०
बौद्धिक संपदा अधिकार महत्वाचे मुद्दे – - बौद्धिक संपदा म्हणजे काय ? - बौद्धिक संपदा अधिकार IPR - कॉपीराईट –लेखाधिकार Copyrights - औद्योगिक संकल्पचित्र Industrial Design - ट्रेड मार्क (व्यापार चिन्हे) - परंपरागत ज्ञानभंडार ( Protection of Traditional Knowledge ) - इंडीग्रेटेड सर्किट्स ( Integrated Circuits) - Conclusion समारोप
संपदेचे वर्गीकरण दर्शविणारा तक्ता मालमत्ता खाजगी स्वत:चे घर सार्वजनिक धर्मशाळा,बस स्टॉप सरकारी कार्यालये धरणे, पूल मूर्त / दृश्य अदृश्य / अमूर्त मत्ता स्थावर शेती दुकान घर जंगम गाडी सोने चांदी बौद्धिक संपदा गुडविळ ख्याती टेनन्सी व इतर
बौद्धिक संपदा म्हणजे काय ? - मानवी मनाच्या व बुद्धीच्या मदतीने निर्माण झालेली मालमत्ता म्हणजे बौद्धिक संपदा होय. - कल्पना किंवा माहिती यांचे सदरीकर्ण किंवा स्वरूप प्रगटीकरण करण्याचे स्वरूप किंवा पद्धत संबधी असलेल्या अपवर्जक अधिकारांचा समुदाय म्हणजे बौद्धिक संपदा होय. - शारीरिक मेहनत अथवा श्रमदानातून निर्माण न होता बौद्धिक श्रमदानातून निर्माण होणाऱ्या मालमत्तेला ‘बौद्धिक संपदा’ म्हणतात.
बौद्धिक संपदा - औद्योगिक - साहित्य व कला - इतर - पेटंट - कॉपीराईट - संगणक आज्ञावली - वस्तू पेटंट - प्रक्रिया पेटंट - इतर - वनस्पतींची विविधता - व्यापारचिन्ह - कलाकारांचे सादरीकरण - सेवाचिन्ह - प्रक्षेपकांचे प्रक्षेपण - सूक्ष्म जैविक संपदा - औद्योगिक संकल्प चित्रे - परंपरागत ज्ञान - ले आऊट डिझाईन्स - भौगोलिक विशेषता - अप्रगट (गुप्त) माहिती - इंटीग्रेटेड सर्किट्स
बौद्धिक संपदेची वैशिष्ट्ये - ही संपदा विकसीत होत आहे. बौद्धिक संपदेमुळे मूल्यवृद्धी होते. बौद्धिक संपदा धारकास मोबदला मिळाला पाहिजे बौद्धिक संपदा जरी अमूर्त किंवा अदृश्य मालमत्ता असली तरी तिच्या पासून मूर्त मत्ता तयार होते. १९८६ साली स्वित्झर्लंड मधील बर्न शहरात झालेल्या परिषदेत साहित्यकृती व कलाकृती च्या संरक्षणासाठी कॉपीराईट कायद्याचा प्रारंभ झाला. १९९५ मध्ये जागतिक व्यापार संघटनेच्या पुढाकाराने (WTO) सदस्य देशांनी आपआपल्या क्षेत्रातील बौद्धिक संसदेचे हक्क रक्षण करणे यात व्यापार संबधीचे अधिकार व करार यांचा समावेश आहे. १५४ देशांनी या संबधी कायदे केले आहेत.
बौद्धिक संपदेत खालील बाबींच्या अधिकाराचा समावेश होतो १. साहित्य, कला व शास्त्रीय कार्य २. कला सादर करणारे कलाकार, फोलोग्राम्स आणि ध्वनिक्षेपिक करणाऱ्यांची अदा/सादरीकरण ३. मानवी प्रयासांच्या सर्व क्षेत्रातील शोध ४. शास्त्रीय शोध ५.औद्योगिक संकल्प चित्रे / नकाशे ६. व्यापारचिन्हे, सेवाचिन्हे ७. औद्योगिक, शास्त्रीय, साहित्य किंवा कला क्षेत्रातील बौद्धिक कामामुळे निर्माण होणारे अधिकार
बौद्धिक संपदा अधिकाराचे स्वरूप - शोधकर्त्याला कायद्याने विशिष्ट काळासाठी मक्तेदारी मिळते. - त्याच्या परवानगीशिवाय त्याचा वापर अन्य कोणी करून शकत नाही - त्याची विक्री कोणासही करून शोधकर्ता आर्थिक लाभ मिळवू शकतो. आर्थिक लाभ मिळवितो.
बौद्धिक संपदा अधिकार देण्याची कारणे - शोधकर्त्यास सामाजिक व कायदेशीर मान्यता मिळते. - नवनिर्मितीसाठी प्रोत्साहन - शोध सतत होत राहावेत यासाठी प्रेरणा - नक्कल करून खोटा मार्गाने लाभ उठविणाऱ्याना शासन - बौद्धिक संपदा धारकांना आर्थिक लाभ देणे
कॉपीराईट – लेखाधिकार (Copyrights) - लेखकाच्या व कलाकारांच्या कृतीसाठी ते सुरक्षित राहण्यासाठी दिलेला हक्क म्हणजे कॉपीराईट - काव्य, कथा, कादंबरी नाटक, सिनेमा नृत्य ध्वनीमुद्रण, फोटोग्राफ्स - पुस्तकावर - परवानगीशिवाय कलाकृतीचे प्रकाशन, विक्री, प्रयोग उपयोग करता येत नाही - भारतात कॉपीराईट कायदा १८४७, १९१४, १९५७, १९८३, १९९४, १९९९ या प्रमाणे वारंवार बदल झाले.
१९९४ च्या कायद्याची दुरुस्ती १. कॉपीराईटचा कालावधी साठ वर्षे केला. २. संगणक आज्ञावली (Computer Programmes) आणि सादरीकरण यांचा समावेश झाला. कॉपीराईट कशासाठी मिळू शकतो ? १. साहित्यकृती – कथा, कादंबरी, नाटक, ललित लेख इ. २. सांगीतिक करिती – ( उदा. गायन, वादन) ३. नाट्यकृती ४. कलाकृती जसे की चित्र, पेंटींग्ज, आलेख, मूर्ती, कृती यात रंगयोजना उदा. रविवर्मा किंवा एम. एफ. हुसेन यांची चित्रे ५. दृकश्राव्य कृती ६. ध्वनीमुद्रण ७. वास्तूरचना कृती ८. संगणक आज्ञावली कॉपीराईट मिळण्यासाठी ती कलाकृती / साहित्यकृती कर्त्याची स्वत:ची नवीन असावी, दुसऱ्याची नक्कल केलेली नसावी.
कॉपीराईट देण्यामागे हेतू काय ? १. साहित्यकृती निर्माण करणाऱ्या कर्त्यास प्रोत्साहन २. त्या कृतीची नक्कल करण्यास शासन ३. समाजाचा सांस्कृतिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न कॉपीराईटचे उल्लंघन म्हणजे काय ? १. कोणत्या तरी प्रत्यक्ष स्वरुपात साहित्य पुर्न:निर्माण २. साहित्यकृतीचे प्रकाशन / पुनर्मुद्रण ३. कलाकृतीचे जाहीर सादरीकरण ४. साहित्यकृतीचे / कलाकृतीचे भाषांतर किंवा बदल
Industrial Design औद्योगिक संकल्पचित्र डिझाईनची कल्पना करणे व एखाद्या औद्योगिक प्रक्रियेने किंवा साधने ते डिझाईन प्रत्यक्षात उतरविणे ही बौद्धिक संपदा आहे भारतातील डिझाईन कायदा पहिला कायदा १८७२ १९११ त्यानंतर २००० ला डिझाईन्स अॅक्ट आमलात आला ११/०५/२००१
डिझाईन नोंदविण्याची प्रक्रिया - नोंदणीसाठी अर्ज -डिझाईनच्या चार प्रती -नाविन्याचे वर्णन Original कसे ? वेगळे कसे ते सांगणे -कंट्रोलर ऑफ डिझाईन कडून हरकती -विचार करून कंट्रोलर ऑफ डिझाईन निर्णय घेतात - नोंदणी प्रमाण पत्र - डिझाईन वापरण्याचा अधिकार उदा. कपड्यावरील डिझाईन, रंग, लेस (Textile Goods)
ट्रेड मार्क – व्यापार चिन्हे 1. HMV
2. Airindia
3. LIC
5. Honda
6. FIAT
7. Wokvagan
8. Puma
9. Adidas
ट्रेड मार्क चे वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत १. ही बौद्धिक संपदा आहे. तिला कायद्याने संरक्षण दिलेले आहे. २. निवडलेले चिन्ह उत्पादनावर दाखविलेले असते. ३. मार्क, चिन्ह, खून – बाजारपेठेतील प्रसिद्धीसाठी निगडीत आहे. ४. त्याला कायद्याने संरक्षण दिलेले आहे. ५. १९९९ पासून लोकसभेत Trade Mark Bill सादर करण्यात आले. ६. ट्रेड मार्क नोंदणीकृत / अनोंदणीकृत असू शकतो.
समारोप थोडक्यात बौद्धिक संपदा अधिकारामुळे मिळणारी मक्तेदारी योग्य पद्धतीने हाताळली पाहिजे. त्यामुळे पुरवठ्यात कपात व किमतीत अवास्तव वाढ होणार नाही याची प्रशासकीय पातळीवर दखल घेतली गेली पाहिजे. तसेच पेटंट धारकांची संशोधनामुळे इच्छा संपता कामा नये. उलट अधिकाधिक संशोधन होऊन विकासाकडे वाटचाल, घोडदौड चालू राहिली पाहिजे. बौद्धिक संपदा अधिकाराचा हा हेतू आहे.
I am grateful to mahararaja , Puma, lic , , Adidas.Lic,Fiat,Vokswagen,Honda symbol makers( Intelllegent persons)