MUNICIPAL COUNCIL WADI ,TA. DIST. NAGPUR

comcwadi 6 views 20 slides Sep 20, 2025
Slide 1
Slide 1 of 20
Slide 1
1
Slide 2
2
Slide 3
3
Slide 4
4
Slide 5
5
Slide 6
6
Slide 7
7
Slide 8
8
Slide 9
9
Slide 10
10
Slide 11
11
Slide 12
12
Slide 13
13
Slide 14
14
Slide 15
15
Slide 16
16
Slide 17
17
Slide 18
18
Slide 19
19
Slide 20
20

About This Presentation

MUNICIPAL COUNCIL WADI


Slide Content

डॉ. ऋचा धाबर्डे ( म.श.प्र.से. ) प्रशासक तथा मुख्याधिकारी नगर परिषद वाडी 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम नगर परिषद वाडी जि. नागपूर

नगर परिषद वाडी चे संकेतस्थळ URL खालीलप्रमाणे आहे. https://mahaulb.in/PortalSite/#/app/home नगर परिषद वाडी चे संकेतस्थळ नागरिकास वापरण्यास सुलभ असून त्यांना आवश्यक सेवा उपलब्ध करून घेण्याची सुविधा आहे. उदा. घरपट्टी, पाणीपट्टी कर ऑनलाईन माध्यमातून भरणे, तक्रार नोंदवणे. अ. वापरण्यातील सुलभता ( User Friendly) 1. संकेतस्थळ आ. माहितीचे अद्ययावतीकरण ( Updated Information) नगर परिषद वाडी मार्फत नगर परिषदेशी संबधित माहिती संकेस्थळावर अद्ययावत करण्यात आलेली आहे. इ. माहिती अधिकार अधिनियामांतर्गत माहीतीचे स्वयंप्रकटीकरण ( Proactive disclosure under RTI Act ) माहिती अधिकार अधिनियम 2005 चे कलम 4 ( 1 ) ( ख ) अन्वये 17 मुद्द्यांची माहिती संकेस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर संकेस्थळ शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेले असून संकेस्थळावर डाटा अपलोड करणेकरीता Login Credential वापरले असल्याने संकेतस्थळ सुरक्षित आहे. ई. सुरक्षितता उ. लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत सेवा अधिसूचित करून ऑलाईन प्रसिद्ध करणे . महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ कलम ३ अन्वये नगर परिषद कार्यालय वाडी मार्फत एकूण ६७ सेवा अधिसूचित करण्यात आलेल्या असून लोकसेवांची सूची , नियत कालमर्यादा , पदनिर्देशित अधिकारी , प्रथम अपिलिय अधिकारी व द्वितीय अपिलीय अधिकारी यांची यादी नगर परिषद सूचना फलक , स्थानिक वृत्तपत्र , नगर परिषद संकेतस्थळ व शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .

1 . मालमत्ता कराचा भरणा नागरिकांना घरी बसून सहजरित्या करता यावा याकरिता नगर परिषद मार्फत nagarkaryavali हे मोबाईल अप्लिकेशन play store वर उपलब्ध करून देण्यात आले आहे. 2. सुकर जीवनमान 1. नागरी सेवांचे सुलभीकरण कालावधी एकूण वापरकर्ता एकूण मालमत्ता कर रक्कम नोव्हेंबर 2024 ते मार्च 2025 383 2076300/- 2. विवाह नोंदणी प्रमाणपत्र अगोदर ऑफलाईन पद्धतीने दिल्या जात होते तथापी सध्या सदर प्रमाणपत्र IWBP पोर्टल च्या माध्यमातून दिले जात आहे . सेवेचा तपशिल एकूण संख्या विवाह नोंदणी 115 पूर्वी सध्या

नगर परिषदेचे अभिलेख जतन करून ठेवण्यासाठी अभिलेखांचे अ, ब, क, ड नुसार वर्गीकरण करण्यात आलेले आहे. नगर परिषदेचे अभिलेखाचे निंदनीकरण व वर्गीकरणाची कार्यवाही पुर्ण करण्यात आली असून मुदतबाह्य अभिलेखेत नष्ट करण्याबाबतचे निर्देश संबधित विभाग प्रमुख यांना देण्यात आलेले आहेत. 3. स्वच्छता अ. अभिलेख निंदनीकरण व वर्गीकरण : आ. मुदतबाह्य अभिलेख नष्ट करणे

नगर परिषद मार्फत विविध विभागात खरेदी करण्यात आलेल्या साहित्यानुसार जड वस्तू संग्रह नोंदवही अद्ययावत करण्यात आलेली आहे. 3. स्वच्छता इ. जड वस्तू संग्रह नोंदवही अद्ययावतीकरण वस्तूचे नाव नग खुर्ची 146 लोखंडी कपाट 11 टेबल 13 कुलर 05 ई. जुन्या व निरुपयोगी जड वस्तूंची विल्हेवाट नगर परिषद मार्फत निरुपयोगी व जड वस्तूंचा लिलाव सन - 2023 मध्ये करण्यात आलेला आहे. उ. जुन्या वाहनांचे निर्लेखन नगर परिषद मालकीचे 15 वर्षापेक्षा जास्त वय झालेले वाहन वापरात नाही.

आपले सरकार पोर्टल वरील वाडी नगरपरिषदेला प्राप्त सर्व तक्रारीचे निराकरण करण्यात आले आहे. आ. पी.जी. पोर्टलवरील तक्रारीचे निराकरण अ. आपले सरकार पोर्टलवरील तक्रारीचे निराकरण 4. तक्रार निवारण दि. 01/04/2025 पर्यंत पी. जी. पोर्टलवरील वाडी नगरपरिषदेला प्राप्त सर्व तक्रारीचे निराकरण करण्यात आले आहे. सद्यस्थितीत पोर्टलवर 01 तक्रार प्रलंबित असून सदर तक्रारीचे निराकरण करण्याची कार्यवाही सुरु आहे. माध्यम एकूण प्राप्त तक्रारी एकूण निवारण केलेल्या तक्रारी प्रलंबित तक्रारी टक्केवारी आपले सरकार पोर्टल 05 05 100 % माध्यम एकूण प्राप्त तक्रारी एकूण निवारण केलेल्या तक्रारी प्रलंबित तक्रारी टक्केवारी P G पोर्टल 2 1 01 50%

अभ्यागत भेटीकरिता मुख्याधिकारी दालनाबाहेर मुख्याधिकारी यांना भेटण्याची वेळ प्रसिद्ध करण्यात आली आहे. लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आल्यानंतर त्या अंतर्गत प्राप्त तक्रारीचे तात्काळ निराकरण करणे बाबत सर्व विभाग प्रमुख यांना निर्देश देण्यात आलेले आहे . 4. तक्रार निवारण इ. अभ्यागत भेटीचे नियोजन व भेटीच्या वेळाबाबत प्रसिद्धी ई. लोकशाही दिनाचे आयोजन व त्यामधील तक्रारीचे निराकरण एकूण प्राप्त तक्रारी निरासन केलेल्या तक्रारी टक्केवारी 21 21 100%

नगर परिषद कार्यालया मध्ये पिण्याच्या पाण्याकरिता नगर परिषदेत वॉटर कुलर फिल्टर बसविण्यात आले आहे. 5. कार्यालयीन सोई सुविधा अ. कायमस्वरूपी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आ. कर्मचारी व अभ्यागत यांचेसाठी स्वच्छ प्रसाधन गृहाची सुविधा नगर परिषद मध्ये कर्मचारी व अभ्यागतांसाठी स्वतंत्र प्रसाधन गृहाची व्यवस्था आहे. सदर प्रसाधनगृहाची दैनंदिन स्वच्छता करण्यात येते. इ. महिला कर्मचारी व अभ्यागत यांचेसाठी स्वच्छ प्रसाधन गृहाची सुविधा महिला कर्मचारी व दिव्यांग अभ्यागत यांचेकरिता स्वतंत्र प्रसाधन गृहाची व्यवस्था आहे. सदर प्रसाधनगृहाची दैनंदिन स्वच्छता करण्यात येते. पुरुष प्रसाधनगृह महिला प्रसाधनगृह दिव्यांग पुरुष प्रसाधनगृह दिव्यांग महिला प्रसाधनगृह 05 05 04 04

मुख्याधिकारी तसेच इतर विभाग प्रमुख यांना भेटण्यासाठी आलेल्या नागरिकांकरिता प्रतिक्षालय कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. प्रतिक्षालयामध्ये नागरिकांना वाचण्याकरिता वृत्तपत्र व पुस्तके उपलब्ध करून देण्यात आले आहे. ई. अभ्यागतांसाठी सुसज्ज प्रतिक्षालय व्यवस्था 5. कार्यालयीन सोई सुविधा उ. कार्यालायामध्ये सुव्यवस्थित नामफलक , दिशादर्शक फलक लावणे व कार्यालयाचे सौंदर्यीकरण कार्यालयामध्ये सुव्यवस्थित नामफलक , दिशादर्शक फलक लावण्यात आलेले आहे.

कार्यालयामध्ये दिव्यांगाकरिता स्वतंत्र लिफ्ट ची व्यवस्था करण्यात आली असून त्याबाबतचे सूचना फलक लावण्यात आले आहे. 5. कार्यालयीन सोई सुविधा उ. कार्यालायामध्ये सुव्यवस्थित नामफलक , दिशादर्शक फलक लावणे व कार्यालयाचे सौंदर्यीकरण नगर परिषद कार्यालय वाडी ये थे सर्व सोई सुविधा युक्त हिरकणी कक्ष तयार करण्यात आलेला आहे.

कार्यालयामध्ये येणारे कर्मचारी व अभ्यागत यांच्या वाहना करिता दु चाकी , चार चाकी, अग्निशमन वाहन व नो पार्किंग क्षेत्राची आखणी करण्यात आली असून त्याबाबतचे फलक लावण्यात आलेले आहे . 5. कार्यालयीन सोई सुविधा उ. कार्यालायामध्ये सुव्यवस्थित नामफलक , दिशादर्शक फलक लावणे व कार्यालयाचे सौंदर्यीकरण

5. कार्यालयीन सोई सुविधा उ. कार्यालायामध्ये सुव्यवस्थित नामफलक , दिशादर्शक फलक लावणे व कार्यालयाचे सौंदर्यीकरण कार्यालयातील परिसरात सौंदर्यीकरणा करिता छोटे रोपटे व वृक्षांची लागवण करण्यात आलेली असून इमारतीमध्ये रोपट्यांच्या कुंड्या लावण्यात आलेल्या आहे. कार्यालयीन परिसर सुसोभित करण्याकरिता टाकाऊ वस्तूंपासून भिंतीचित्र तयार करण्यात आले आहे.

नगर परिषद वाडी अंतर्गत प्रत्यक्ष नियंत्रण असलेले क्षेत्रीय कार्यालय नसून नगर परिषद हद्दीतील जिल्हा परिषद शाळा व खाजगी शाळा , अंगणवाडी केंद्र , अभ्यासिका व प्राथमिक आरोग्य केंद्र यांना भेटी देऊन कामकाजाची पाहणी करण्यात येते. 6. क्षेत्रीय कार्यालयांना भेटी अ.आठवड्यातून किमान 2 दिवस क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देऊन पाहणी करणे. इ. क्षेत्रीय भेटी दरम्यान पंचायत , शाळा , अंगणवाडी व प्राथमिक आरोग्य केंद्र यांना भेटी देऊन कामकाजावर देखरेख ठेवणे . आ. केंद्र आणि राज्य शासनाच्या महत्वाच्या कार्यक्रम / प्रकल्पांना भेटी देऊन अंबलबजावणी व पर्यवेक्षण करणे. नगर परिषद मार्फत केंद्र आणि राज्य शासनाच्या राबविण्यात येणाऱ्या महत्वाच्या कार्यक्रम / प्रकल्पांना मुख्याधिकारी व संबधित अभियंता यांच्या मार्फत भेटी देऊन कामाची अंबलबजावणी व पर्यवेक्षण करण्यात येते . ई. ग्राम स्तरावरील कर्मचाऱ्यांचे अनुभव , अडचणी व सूचना यांवर त्वरित कार्यवाही करणे. नगर परिषद कार्यालय वाडी अंतर्गत ग्राम स्तरावरील कार्यालय नाहीत .

मा. नगरपरिषद प्रशासन संचालनालय मार्फत ई-ऑफिस प्रणाली नगर परिषद स्तरावर कार्यान्वित करण्याची कार्यवाही सुरु आहे. कर्मचारी यांचे शासकीय ई-मेल आय डी प्राप्त झाल्यानंतर नगर परिषद स्तरावर ई-ऑफिस प्रणालीची अंबलबजावणी सुरु करण्यात येईल. महाराष्ट्रातील नगर परिषदांकरिता शासनामार्फत तयार करण्यात आलेल्या IWBP पोर्टल च्या माध्यमातून नगर परिषद मार्फत देण्यात येणाऱ्या विविध सेवांकरिता 4 किंवा त्यापेक्षा कमी स्तरावर मान्यता घेऊन प्रकरणाचा निपटारा करण्यात येत आहे . 7. ई-ऑफिस प्रणाली अ. प्रशासकीय कामकाजात 1 जानेवारी 2025 पासून ई-ऑफिस प्रणालीचा वापर करणे. आ. ई-ऑफिस प्रणालीत 4 किंवा त्यापेक्षा कमी स्तरावर मान्यता घेऊन प्रकरणाचा निपटारा करणे. 1 2 3 लिपिक विभाग प्रमुख मुख्याधिकारी

8 . आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन अ. गुंतवणूकदार उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी पोषक वातावरण तयार करणे आ. व्यापारी / कामगार वर्गाच्या संघटनांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी सोडविणे . ई. गुतंवणूकदार उद्योजकांसाठी कायदा व सुव्यवस्था प्रभावीपणे हाताळणे. इ.गुतंवणूकदार उद्योजकांच्या अडचणीचे निराकरण करणे. नगर परिषद वाडी हद्दीत गोदाम व्यवसायाचे प्रमाण जास्त असून रस्ते , पाणी व मलनिस्सारण ई. मुलभूत सुविधा तसेच दिवसातून दोन वेळा कचरा उचलण्यासाठी घंटागाडीची व्यवस्था करण्यात आलेली आहे . गुंतवणुकदारास नगर परिषदेशी संबधित आवश्यक परवानग्या प्राथमिक तत्वावर देण्यात येते. गुंतवणुकदारांच्या प्राप्त तक्रारींचे निराकरण जलद गतीने करण्यात येऊन उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी नगर परिषद कार्यालय प्रयत्नशील आहे. गुतंवणूकदार उद्योजकांसाठी कायदा व सुव्यवस्थेचा विषय पोलीस विभागामार्फत हाताळण्यात येतो कार्यालयास प्राप्त व्यापारी संघटनांच्या विषयावर चर्चा करून त्यांच्या तक्रारींचे निराकरण प्राधान्याने करण्यात येते.

नगर परिषदेमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी यांचे प्रशिक्षण मा. नगरपरिषद प्रशासन संचालनालय मार्फत वेळोवेळी राबविण्यात येते. स्वच्छता विभागातील कर्मचारी यांची क्षमता बांधनिकरिता स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन इत्यादी विषयांवर नियमित स्वरुपात प्रशिक्षण आयोजित केले जाते. 9 . अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण , सेवा विषयक बाबी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर ( AI ) अ. नव्याने सेवेत प्रविष्ट अधिकारी / कर्मचारी यांना प्रशिक्षित करणे . नगर परिषद कर्मचारी यांच्या आस्थापना विषयक बाबीवर विहित कालावधीत कार्यवाही करण्यात येते तसेच कर्मचाऱ्यांच्या प्राप्त तक्रारींचे निराकरण प्राधान्याने करण्यात येते. आ. पदोन्नत्या व कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचे निराकरण करणे.

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञांनाचा वापर ( AI ) कार्यालायतील कामकाजात अचूक होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यलयामार्फत अधिकारी / कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. विविध ( AI ) TOOLS चा वापर दैनंदिन कामकाजात करण्याबाबत अधिकारी व कर्मचारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत . 9 . अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण , सेवा विषयक बाबी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर ( AI ) इ. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरण्यासाठी अधिकारी / कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे . ई. कार्यालयातील कामकाज अचूक होण्यासाठी प्रत्यक्ष कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञांनाचा वापर ( AI ).

नगर परिषद प्रशासकीय इमारतीवर उर्जा संवर्धनाच्या दृष्टीकोनातून 65 किलो व्हॅट क्षमतेचा पारेषण संलग्न सौर ऊर्जा प्रकल्प आस्थापित केला आहे. त्यामुळे दर महिन्याला येणारे विजेचे देयकामध्ये ९०% बचत झाली आहे. तसेच वाडी नगर परिषदेचे घनकचरा प्रकल्पाकरिता नगर परिषद वाडी मार्फत २५ किलो व्हॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प आस्थापित करण्यात आले आहे. तिथे सुद्धा ८०% बचत दर महिन्याला होत आहे 10. नाविन्यपूर्ण उपक्रम नाविन्यपूर्ण उपक्रम - 1

नगर परिषद प्रशासकीय इमारत परिसर मध्ये 15 किलो व्हॅट इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जीग स्टेशन बसविण्यात आले. सदर ई इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जीग स्टेशन मध्ये दुचाकी करिता A C चार्जीग आणी चारचाकी करिता D C चार्जीग उपलब्ध आहे . 10. नाविन्यपूर्ण उपक्रम नाविन्यपूर्ण उपक्रम - 2 नाविन्यपूर्ण उपक्रम - 3 शहरातील संकलित करण्यात आलेल्या कचऱ्यावर घनकचरा व्यवस्थापन केंद्रामध्ये दैनंदिन स्वरुपात करण्यात आलेल्या वर्गीकरणाची माहिती नगर परिषद कार्यालयात लावण्यात आलेल्या डिजिटल स्क्रिनवर दर्शविण्यात येते .

धन्यवाद नगर परिषद वाडी जि. नागपूर डॉ. ऋचा धाबर्डे ( म.श.प्र.से. ) प्रशासक तथा मुख्याधिकारी नगर परिषद वाडी
Tags