मूत्र विरेचनीय / बस्तिशोधन / मुत्रल. - मूत्र मात्रा वृद्धी करणारी द्रव्ये. मूत्र जलीय आणि आग्नेय म्हणून शीत वीर्य व उष्ण वीर्य दोन्ही द्रव्यांचा समावेश . शीत द्रव्य = मूत्र प्रमाण वर्धन , सूक्ष्म नलिका मधील जलांश शोषण अवरोध = मूत्र वृद्धी e.g. तृण पंचमुल उष्ण वीर्य द्रव्य = वृक्का मधील रक्तस्त्राव वाढवून वृक्क क्षोभ उत्पत्ती - मूत्र स्त्राव वाढवते e.g. मारीच , पुनर्नवा मुत्रविरजनीय = जे द्रव्य मूत्र वर्ण प्राकृत करतात मूत्रवह स्त्रोतस
अशमरिभेदन = अशमरीचे भेदन करणारे द्रव्य तीक्ष्ण असल्याने भेदन कार्य e.g. पाषाणभेद , कुल्लथ द्रव्य मूत्रल असल्याने अशमारी निर्मिती थांबवणे. Eg. दुर्वा गोक्षुर मुत्रसंग्रहनीय = मूत्र प्रवृत्ती कमी करणारे कषाय रसाने जलांश शोषण करणारे .जम्बू आग्नेय गुणाने जलांश शोषण भल्लातक
गण - ( च० ) = वयःस्थापन , कासहर , स्वेदोपग , अनुवासनोपग ( सु० ) = विदारिगंधादि Family = पुनर्नवा - कुल - Nyctaginaceae - रात्री फुलणारी . Flowers open at 4 O'clock in the evening and fall off at the break of day. Latin name - ( Boerhavia diffusa Linn. ) Boerhavia = (Named in honour of physician H. Boerhave .) difussa = loose, spreading open, widely spreading, Linn . पुनर्नवा
पुनर्नवा = पुनः पुनर्नवा भवति - जी पुन्हा प्रतिवर्षी नवीन होत जाते. - शरीरं पुनर्नवं करोति - जे रसायन व रक्तवर्धक असल्याने शरीर पुन्हा नवीन करते . शोषघ्नी = शोषनाशक वर्षाभू - वर्षासु पुनः नवीना भवतीति ।= वर्षा ऋतू मध्ये पुन्हा उत्पन्न होते. - हिं . = गदहपुरना , गदहबिण्डो , बिसखपरा . - म०= ( घेटुळी ) - गु . = राती साटोडी , बसेडो रातोवसेडो - पं . = इटसिट ., - बं . = पुनर्नवा , गदापुष्पा . English = Spreading hogweed
गुण रस-मधुर , तिक्त , कषाय विपाक-मधुर वीर्य-उष्ण गुण-लघु , रूक्ष दोषकार्य - त्रिदोषहर , मधुर , कडू व कषाय म्हणून पित्तघ्न , उष्णवीर्य म्हणून कफवातशामक , रक्तपुनर्नवा मात्र शीतवीर्य असल्याने वातवर्धक व पित्तहर .
जाती - दोन . (१) रक्तपुनर्नवा (२) श्वेतपुनर्नवा रक्तपुनर्नवा = क्षुप , पान व फुल तांबूस असते . रक्त पुनर्नव्याची वेल पांढऱ्यापेक्षा अधिकतर लांब असते . तांबडी पुनर्नवा अधिक सुलभतेने मिळते . राजनिघण्टुत निळ्या पुनर्नव्याचा एक प्रकार दिला आहे . रक्तपुनर्नवा - बेल रंग लाल - Boerhavia diffusa . family -. Nyctaginaceae . २. रक्तपुष्पा , श्वेतमूला - Trianthema portulacastrum Family - Ficoidaceae .
स्वरूप - बहुवर्षायु - एकवर्षायु प्रतानिनी वेल - ०.७५ ते १ मी . लांब , काही वेळेस 4 मी.लांब आढळते . पाने - २.५ ते ४ से.मी , लांब , अंडाकृती , मांसल , मऊ लव असलेली,एकान्तराने येणारी , मागील बाजूस पांढरी असतात . समोरासमोर निघणारी पाने नेहमी एक लहान व एक मोठे असते . फुले = बारीक , पांढऱ्या रंगाची अथवा आबाशाई रंगाची , फळ = १ सें.मी . लांब , गोलाकार , चवळीप्रमाणे बी असणारे . मूळ - जाड , दडस , वाळल्यावर त्याला पीळ पडतो . पानांचा विशेष असा की , वर्षाऋतूत वेली वाढतात , ग्रीष्मात सुकतात .
श्वेतपुनर्नवा - Trianthema portulacastrum
Boerhavia erecta
कर्म व प्रयोग बाह्यतः लेखन व शोथघ्न - शोथरोगावर पुनर्नवा हा स्वेद , उपनाह स्वेद , लेपाने उपयोगी पडतो . याचे सिध्दतैलही उपयोगी पडते . नेत्ररोगात पुनर्नवामूळ स्वरस डोळ्यांत टाकतात . पाचनसंस्थान - अग्निमांद्य , गरनाशक , उदर , विबंध यांवर पोटात देणे , वमनासाठी ३ ग्रॅम चूर्ण देणे . आभ्यंतर = आभ्यंतर - दीपन , अनुलोमन , विरेचक , लाल पुनर्नवा ग्राहि , अधिक मात्रेत वामक .
रक्तवहसंस्थान - हृद्रोग , पांडुरोग , शोथ या विकारांत उत्तम उपयोगी . शोथ = शोथात याच्या पानांची भाजी खाण्यास देतात . = ' पुनर्नवा च शोथघ्नी ’. शोथ पुनर्नवा मूल क्वाथ + शुंठी (च चि . २३) चक्रदत्त-शोथ = पुनर्नवा क्वाथ & कल्क सिद्ध घृत सेवन सुश्रुत शाकवर्ग = " तेषु पौनर्नवं शाकं विशेषात शोफनाशनम् ” श्वसनसंस्थान - कास , श्वास , उर:क्षत यांत उपयोगी . पांडुघ्नी ( पुनर्नवामंडुर - योग पांडुरोगात उत्तम कार्य करतो .)
नेत्रविकार - डोळ्यांतील फूल , जुनाट अभिष्यंद , खुपऱ्यावर मुळी मधात उगाळून अंजन करतात व पोटातही देतात . भावप्रकाश - नेत्ररोग = पुनर्नवा मूल दूध मध्ये घासून डोळ्यांत लावणे - खाज नष्ट पुनर्नवा मूल मधु मध्ये घासून लावणे = डोळ्यांतूनवाहणारे पाणी थांबते पुनर्नवा मूल मध्ये घासून लावणे - अंजन करने डोळ्यांतील फूल मिटत पुनर्नवा मूल मध्ये घासून लावणे = तिमिर , अंधेरापन मिटता है . पुनर्नवा मूल कांजी मध्ये घासून लावणे = अन्धापन दूर होता है .
विद्रधि नष्टता - श्वेत पुनर्नवा के मूल पाण्यात उकळून पिणे तापक्रम - एकूण ज्वरात उपयोगी , पण चातुर्थिक ज्वरात अधिक उपयोगी पडते . ज्वर सब प्रकार ज्वर नाश = समभाग दूध + जल + पुनर्नवामूल क्षीरपाक बंगसेन - पैत्तिक ज्वर , चिरकालीन चातुर्थिक ज्वर = श्वेत पुनर्नवा मूल चूर्ण + दूध पिणे . प्लीहोदर - श्वेत पुनर्नवा मूल चूर्ण + तण्डुलोदक पिणे . प्रजननसंस्थान - रक्तप्रदर - रक्तपुनर्नव्याच्या मुळाचा रस उपयोगी . बीज वृष्य = वाजीकरणासाठी बी उपयोगी पडते .
मूत्रवहसंस्थान - मूत्रकृच्छ्रात मूत्रप्रमाण वाढवून उपयोगी पडते . सुश्रुत - अशरीभेदन - पुनर्नवा के मूल + दूध = उकळून पिणे . त्वचा - स्वेदजनन व कुष्ठघ्न आहे . कुष्ठरोगात शोथ व कूज कमी होण्यासाठी उपयोगी . कुष्ठ - पुनर्नवा मूल + दही मंड ( चरक चि.७) मदात्यय - पुनर्नवा मूल क्वाथ + दुग्ध + मधुयष्टि कल्क + घृत = सिद्ध घृत . सेवन - शक्ति संचार , मदात्यय नाश .
रसायन – पुनर्नवा मूल चूर्ण २ तो०, प्रतिदिन / एक पक्ष / एक मास / दो मास / ६ मास / एक वर्ष दूध सोबत पिण्याने वृ द्ध मनुष्याला देखील यौवन प्राप्त होते सात्मीकरण - दौर्बल्यात रसायन प्रयोगाने उपयोगी . विषघ्न सर्प , उंदीर यांच्या विषावर पोटातून देतात . आलर्कविष - श्वेत पुनर्नवा मूल चूर्ण + धतूर बीज
मूषक विष - श्वेत पुनर्नवा मूल चूर्ण + मधु नियमित सेवन (क. ६) विषदोष असर निवारण & सर्पविष नाश – पुष्यनक्षत्र - श्वेत पुनर्नवा मूल + तण्डुलोदक पिणे निद्राकर = पुनर्नवा मूल का क्वाथ . पुनर्नवाक्वाथो निद्राकरो नृणाम् ।। ( हारीत ) आमवात - कर्पूर + शुंठी कल्क + पुनर्नवा क्वाथ = सात दिन पिणे . ( भावप्रकाश ) सन्धिवात - पुनर्नवा शाक हितकर ( भावप्रकाश )
उत्पत्तिस्थान - संबंध भारत . प्रयोज्य अंग-मूल , बी , पंचांग , पाने . मात्रा-स्वरस-५-१० मि० लि०, बीजचूर्ण-१-३ ग्रा० विशिष्ट योग-पुनर्नवाष्टक , पुनर्नवासव , पुनर्नवाम्बु , पुनर्नवादिमंडूर