DHANESHWRI AYURVED MEDICAL COLLEGE AURANGABAD Name: Aftab Asif Shah Subject : Padharth Vigyan Topic: sankhya darshan Roll.No:50 Guided by:- Dr.Sarika Gaikwad ma’am
2. प्रकार - आस्तिक 3. पदार्थ :- (A) दोनच पदार्थ प्रकृती व पुरुष (B) पंचविंशति तत्त्व हे पंचवीस पदार्थ 4. प्रमाणे : - 1. प्रत्यक्ष 2. अनुमान 3. आगम 5. प्रयोजन :- (a) त्रिविध दुःखांपासून आत्यन्तिक निवृत्ती मिळणे. (b) प्रकृतीपासून अलिप्त अशा आत्म्याची अनुभूती प्राप्त करणे (c) कैवल्य अर्थात मोक्षप्राप्ती करणे 6. सिद्धान्त :- 1. सत्कार्यवाद 2. परिणामवाद 3. त्रिगुणसिद्धान्त 4. अहंकारापासून इंद्रिये व महाभूतांची उत्पत्ती 1. कर्ता:- महर्षी कपिल मुनी
सांख्य शब्दाचा अर्थ :- शुद्धात्मतत्वविज्ञानं सांख्यं इत्यभिधीयते ।सम्यक् ख्याति या सांख्य। भ.गीता पंचवीस तत्त्वांचे संख्यान (गणना) सांख्यदर्शनामध्ये केली आहे म्हणून सांख्यदर्शन अशी संज्ञा लाभली. 7. सांख्य दर्शनावरील प्रमुख ग्रंथ ( सांख्यसूत्रे - कपिलमुनी षष्टीतंत्र - कपिलमुनी सांख्यकारिका - ईश्वरकृष्ण सांख्यकारिकेवरील टीका सांख्यतत्वकौमुदी - वाचस्पतिमिश्र सांख्यतत्वप्रवचनभाष्य – विज्ञान भिक्षु
zaid 8. सांख्यदर्शनाचे प्रमुख प्रयोजन :- दुःखत्रयाभिघातात् जिज्ञासा तत् अपघातके हेतौ । सां कारिका 1 या संसारामध्ये तीन प्रकारची दुःखे असतात . आध्यात्मिक आधिभौतिक आधिदैविक
आध्यात्मिक दुःख 1. शरीरातील दोषधातुमलांच्या विकृतीमुळे होणारे रोग उदा० ज्वर, अतिसार, कुष्ठ इ 2. रज तम दोषांच्या विकृतीमुळे होणारे रोग उदा०- ईर्ष्या, भय, क्रोध इ. आधिभौतिक दुःख 1. शस्त्रास्त्रांच्या आघातामुळे होणारे रोग. 2. प्राण्यांच्या मारण्याने, चावण्याने, विषाने होणारे दुःख 3. वीज पडल्यामुळे, भूकंपामुळे होणारे दुःख. आधिदैविक दुःख :- देव, ग्रह, राक्षस, गंधर्व इत्यादींच्या कोपांमुळे होणारे दुःख.
10. सांख्योक्तसृष्टी विकासक्रम सांख्याच्या सृष्टीविकासक्रमामध्ये खालील महत्त्वाचे घटक व प्रक्रिया सांगिल्या आहेत . प्रकृती व पुरुष ही दोन मुख्य तत्त्वे आहेत . प्रकृती ही त्रिगुणात्मक व जड अशी आहे . सृष्टीविकासाचे उपादान ( समवायि ) कारण प्रकृती होय . सृष्टीविकासाची एकूण 25 तत्त्वे सांगितली आहेत .
त्या तत्त्वांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे केले आहे- केवलप्रकृती :- हीच मूलप्रकृती होय. या प्रकृतीला कोणतेही कारण नाही. परंतु ही महत् या तत्त्वाला जन्म देते. प्रकृती कारण प्रकृती विकृती :-प्रकृती कारण विकृती – कार्य जे तत्त्व एखाद्या तत्त्वाला जन्म देते (प्रकृती) व दुसऱ्या एखाद्या तत्त्वापासून जन्मलेले असते (विकृती) असे तत्त्व म्हणजे प्रकृती विकृती होय. प्रकृती विकृती सात आहेत.महत्, अहंकार व पंचतन्मात्रा या प्रकृती विकृती होत .( c) विकृती/विकार/षोडशविकार :-हे कोणापासून तरी जन्म घेतलेले असतात परंतु यापासून स्वतंत्र असे कोणतेही तत्त्व तयार होत नाही. पंचज्ञानेन्द्रिये, पंचकर्मेन्द्रिये, मन, पंचमहाभूते हे सोळा विकार आहेत. यांना षोडशविकार असे म्हणतात.
(d) न प्रकृती न विकृती :- असे तत्त्व जे साक्षात कोणाला जन्मही देत नाही व कोणापासून उत्पन्नही झालेले नसते . पुरुष हे तत्त्व न प्रकृती न विकृती होय .
पुरुष हे सृष्टीनिर्मितीचे निमित्त कारण आहे प्रकृतीमध्ये सत्त्व, रज, तम हे महागुण साम्यावस्थेत असतात. पुरुषाच्या संयोगाने प्रकृतीमधील त्रिगुणांची साम्यावस्था नाहीशी होते. त्यानंतर त्रिगुणांच्या परस्परसंयोगामुळे महत् अहंकार इत्यादी तत्त्वांची निर्मिती होते महाभूतांची व इंद्रियांची उत्पत्ती ही अहंकारापासून होते असे सांख्यांनी मानले आहे आकाश महाभूतसुद्धा शब्दगुणयुक्त अशा शब्द तन्मात्रेपासून उत्पन्न झाले आहे
1. प्रकृतीवर्णन/प्रधान/अव्यक्त सत्त्वरजस्तमसां साम्यावस्था प्रकृतीः । सत्त्व, रज व तम यांची साम्यावस्था म्हणजे प्रकृती होय. ( b) पुरुषाच्या संयोगाने त्रिगुणांची साम्यावस्था नाहीशी होते व प्रकृतीपासून बुद्धितत्त्व (महत्) निर्माण होते (c ) जेव्हा पुरुषाला प्रकृतीचे जडत्व व स्वतःचे चैतन्याचे स्वतंत्र असे ज्ञान होते तेव्हा प्रकृती स्वतत्त्वात म्हणजे मूलरूपामध्ये विलीन होते. (a) प्रकृती ही सृष्टीचे उपादान कारण आहे.
सांख्योक्त सृष्टी विकासक्रम वृक्ष :---
2. पुरुष वर्णन :- पुरि शेते इति पुरुषः । सृष्टीच्या उत्पत्तीसाठीचे निमित्त कारण म्हणजे पुरुष होय. पुरुष हे चेतन तत्त्व आहे.पुरुषांमध्ये कोणतेही गुण नसतात. (a) प्रकृतीपुरुषसाधर्म्य :- i ) अनादीत्व - प्रकृती व पुरुष या दोनही तत्त्वांची उत्पत्ती कशापासूनही झाली नाही. (ii) अनन्तत्व - दोन्ही तत्त्वे नष्ट होत नाहीत. (iii) अलिंगत्व - दोन्ही तत्त्वांचे प्रत्यक्षाने ज्ञान होत नाही. (iv) नित्यत्व - दोन्ही तत्त्वे नित्य आहेत नाशतनि
(v) अनपरत्व या दोन्ही तत्त्वांपेक्षा श्रेष्ठ असे कोणतेही तत्त्व नाही. (vi) सर्वगतत्व - दोन्ही तत्त्वे सगळीकडे व्यापून आहेत. प्रकृती पुरुषभिन्नत्व / वैधर्म्य :-
3. महत् तत्त्व (बुद्धी) निश्चयात्मक ज्ञान करुन देणारे तत्त्व म्हणजे बुद्धीतत्त्व होय. महत् हे प्रकृती विकृतीस्वरूप तत्त्व आहे. प्रकृतीपासून तयार होते. अंहकाराला जन्म देते. महत् हे सत्त्वगुणप्रधान तत्त्व आहे.
4. अहंकार :- अभिमानो अहंकारः । सु.शा.1 अशा प्रकारच्या रूप, शील, वित्त, ऐश्वर्य इत्यादी गुणयुक्त मी अशा प्रकारचा भाव म्हणजे अहंकार होय. अहंकार हेसुद्धा प्रकृतीविकृतीस्वरूप तत्त्व आहे. बुद्धीतत्त्वापासून अहंकारतत्त्वाची निर्मिती होते. अहंकारापासून पंचतन्मात्रा व एकादश इंद्रियांची उत्पत्ती होते. अहंकारामध्येसुद्धा त्रिगुण असतातच परंतु वेगप्रवण असा रजोगुण प्रबल असतो. अहंकारचे तीन भेद आहेत :- ( a) सात्त्विक (वैकारिक) : इंद्रियांच्या उत्पत्तीस प्रमुख कारण होय. ( b) राजस (तैजस ) : चलगुणात्मक असल्यामुळे सात्त्विक व भूतादी या दोन्ही अहंकारांना साहाय्यभूत होतो. ( c) तामस (भूतादी) : पंचतन्मात्रांच्या उत्पत्तीस कारणीभूत असा अहंकार.
5. एकादश इंद्रिये :- इंद्रिये ही आत्म्याची ज्ञानाची व क्रियेची शरीरातील सूक्ष्म अशी शक्तिस्थाने आहेत. इंद्रिये ही चेतनत्वाची लक्षणेसुद्धा आहेत.इंद्रिये ही विकार म्हणून गणली जातात. त्यांची उत्पत्ती राजस अहंकाराच्या साहाय्याने व सात्त्विक अहंकारापासून होते.• इंद्रिये ही तीन प्रकारची असतात. ज्ञानेंद्रिये – 5 कर्मेंद्रिये – 5 उभयात्मक- 1 दहा इंद्रियांना बाह्यकरण म्हणतात. मन, बुद्धी, अहंकार यांना अंतःकरण म्हणतात. सर्वांना मिळून 'त्रयोदशविधकरण' असे म्हणतात.
a) तन्मात्रा : आकाशादी महाभूतांच्या सूक्ष्म अशा कारणरूप घटकाला तन्मात्रा म्हणतात. (b) पंचतन्मात्रा या प्रकृतीविकृतीस्वरूप असतात .(c) तामस (भूतादी) अहंकारापासून राजस अहंकारांच्या साहाय्याने पाच तन्मात्रा तयार होतात. (d) शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पाच तन्मात्रा आहेत प्रत्येक तन्मात्रांमध्ये एक-एकच गुण असतो. 6. पंचतन्मात्रा :-
7. महाभूते :- ही विकारस्वरूप आहेत. ही स्थूल व इंद्रियगम्य आहेत. महाभूतांची उत्पत्ती तन्मात्रांपासून होते. काही आचार्यांनी महाभूतांची उत्पत्ती दोन पद्धतीने होते असे (1) एकाच तन्मात्रेपासून एकच महाभूत
(ii) एकैकाधिक तन्मात्रासंयोगाने तन्मात्रा महाभूत 2. शब्द + स्पर्श 3. शब्द + स्पर्श रूप 4. शब्द + स्पर्श + रूप + रस 5. शब्द + स्पर्श + रूप + रस गंध पृथ्वी - गंधगुणबहुल जल - रसगुणबहुल तेज - रूपगुणबहुल आकाश - शब्दगुणयुक्त वायु - स्पर्शगुणबहुल 1. शब्द
त्रिगुणसिद्धांत :- 1. सांख्यदर्शनाने हा सिद्धान्त स्पष्ट केला आहे. 2. प्रकृती ही त्रिगुणात्मक असते.साख्यदशन 3. सत्त्व, रज व तम हे ते त्रिगुण आहेत. 4. मूलप्रकृतीमध्ये हे त्रिगुण समान अवस्थेत असतात. 5. पुरुषाच्या संयोगाने त्रिगुणांमध्ये वैषम्य निर्माण होते व सर्व सृष्टी निर्माण होते. 6. सृष्टीमधील सर्वच घटक हे त्रिगुणांच्या कमी-अधिक प्रमाणातील मिश्रणामुळे तयार झालेले आहेत. 7. सर्व घटकांच्या निर्मितीसाठी हे तीनही गुण एकत्र येऊन कार्य करतात, त्यालाच त्रिगुणांची वृत्ती असे म्हणतात. त्रिगुणांचे स्वरूप :- सत्त्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतीसम्भवाः । निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनं अव्ययम् ।। भ. गीता 14/5 सत्त्व, रज व तम हे प्रकृतीचे गुण आहेत. हे त्रिगुणच अविनाशी अशा आत्म्याला विनाशी अशा शरीरामध्ये बांधून ठेवतात.
त्रिगुणांचा धर्म :-
अंधपंगुन्याय :- प्रकृती व पुरुषाचे सृष्टीनिर्मितीसाठीचे महत्त्व या न्यायातून स्पष्ट केले आहे प्रकृती ही जड म्हणजे आंधळ्या व्यक्तीप्रमाणे आहे. पुरुष हा चेतन परंतु अक्रियाशील आहे. पांगळ्या व्यक्तीप्रमाणे. आंधळा व पांगळा एकेकटय मार्ग चालू शकणार नाही; परंतु पांगळ्या पण डोळस व्यक्तीला (पुरुष) आंधळ्या व्यक्तीने (प्रकृतीने) पाठीवर घेतल्यास मार्गक्रमण होऊ शकते. पांगळा रस्ता दाखवितो (प्रकाशक) व आंधळा पांगळ्याला वाहून नेतो. असेच परस्पर साहाय्याने प्रकृतीपुरुष सृष्टी उत्पन्न करतात.
. सांख्यदर्शन व आयुर्वेद संबंध सांख्यदर्शनातील अनेक सिद्धान्तांचा आयुर्वेदाने स्वीकार केला आहे. सांख्यदर्शनाच्या पंचवीस तत्त्वांचा स्वीकार आयुर्वेदाने केला आहे. सुश्रुताचार्यांनी शारीरस्थानात सृष्टीविकासक्रमामध्ये याचे वर्णन केले आहे. आचार्य चरकांनी मात्र प्रकृती व पुरुष या दोन्ही तत्वांना मिळून अव्यक्त असे एकच तत्व सांगितले . एकूण 24 तत्वे सांगितली आहे . प्रत्यक्ष , अनुमान , आगम ही तीनही प्रमाणे स्वीकारली . प्रत्यक्षप्रमाणबाधक आठ हेतूंचे वर्णन आयुर्वेदाने सांख्यदर्शनामधूनच घेतले आहे . सांख्यांचा त्रिगुणसिद्धान्त आयुर्वेदाने स्वीकारला आहे सत्कार्यवाद व परिणामवाद यांचा स्वीकार केला आहे .